Visual Story : आतापर्यंत 'या' संघांनी जिंकली आहे 'IPL' मालिका

Deshdoot Digital

करोनाच्या सावटानंतर दुबईत सुरु झालेल्या आयपीएलचा विजेता आज ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज समोरासमोर सामना होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत दोन वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांची कसोटी लागणार आहे हे विशेष. चेन्नईचा कर्णधार आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन या दोघांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली ३ वेळा तर केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २ वेळा विजेतेपद मिळवले आहे....

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावे केला आहे. २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये चेन्नईने आयपीएल स्पर्धा जिंकली आहे

अभिनेता शाहरुख खान याच्या असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आतापर्यंत दोनदा आयपीएल मालिका जिंकता आली आहे. २०१२ आणि २०१४ साली कोलकाता मालिका आपल्या नावे केली

राजस्थान रॉयल्स या संघाने पहिल्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन करत या मालिकेवर कब्जा केला होता. त्यानंतर मात्र अद्याप या संघाला विजयश्री प्राप्त होऊ शकली नाही

डेक्कन चार्जर्सने २००९ साली आयपीएलचा किताब आपल्या नावे केला आहे

सनरायझर्स हैद्राबादने आतापर्यत एकदा आयपीएल मालिका जिंकली असून २०१६ साली हा किताब आपल्या आपल्या नावे केला आहे

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलच्या मालिका जिंकल्या आहेत. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या साली मुंबईचे या किताबावर नाव कोरले आहे