टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं इतिहास रचला, भारताला मिळवून दिलं मानाचं पदक

Nilesh Jadhav

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने शनिवारी आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आणि या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.

तिने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या आणि तीन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या हिना हयाता विरुद्धचा कांस्यपदक सामना ४-२ ने जिंकला. मनिका बात्राने प्रतिस्पर्ध्याला ११-६, ६-११, ११-७, १२-१०, ४-११, ११-२ असे पराभूत केले.

या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून ती सुवर्णपदकावर नाव कोरेल अशी सर्व भारतीयांची अपेक्षा होती.परंतु, उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला जपानच्या मीमा इटोनं पराभूत केलं.या पराभवासह बत्राचं सुवर्ण जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

यंदाच्या आशियाई टेबल टेनिस करंडकाचे स्वरूप खडतर आहे. आशियाई खंडातील सर्वोत्तम १६ खेळाडूंना या स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच पहिल्यांदाच थेट बाद फेरीचाही समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे एखाद्या दिवशी सुमार खेळ झाल्यास त्या खेळाडूचे आव्हान तिथेच संपुष्टात येत आहे. शरथ कमल व जी. साथियन यांना पुरुषांच्या एकेरीत पुढे जाण्याची संधी मिळालेली नाही.