अजब लग्नाची गजब गोष्ट! चक्क वयाच्या ६६ व्या वर्षी भारताचे माजी क्रिकेटपटू चढले बोहल्यावर

Nilesh Jadhav

आतापर्यंत आपण अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. पण भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल (Arun Lal marriage) यांच्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात सुरू आहे.

६६ वर्षीय अरुण लाल (Arun Lal) यांनी त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत (Bulbul Saha) लग्न केलंय. अरुण लाल आणि बुलबुल यांचा लग्न सोहळा कोलकातामधील पीयरलेस इन हॉटेलमध्ये पार पडला.

अरुण लाल आणि बुलबुल एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. दोघांची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. अरुण लाल यांचा पहिला विवाह रिना यांच्या सोबत झाला होता.

पण दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार रिना गेल्या काही काळापासून आजारी आहेत आणि त्याच्या परवानगीनेच अरुण लाल यांनी हा दुसरा विवाह केला आहे.

अरुण लाल यांचा जन्म हा १९५५ मध्ये उत्तर प्रदेशात झाला. मात्र, ते बंगालकडून क्रिकेट खेळले. दरम्यान, २०१६ च्या सुमारास अरुण लाल यांना कर्करोग झाला. त्यामुळे त्यांना समालोचनाचे कामही सोडावे लागले.

कर्करोगातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी बंगाल क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. अरुण लाल आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.