नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

Nilesh Jadhav

जगभर प्रचंड लोकप्रिय असलेले WhatsApp हे मेसेजिंग अँप अपडेट होणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये WhatsApp मध्ये अनेक नवी फीचर्स दिसतील.

WhatsApp Calls या पर्यायाचा वापर करुन युझर इंटरनेटच्या मदतीने दुसऱ्या WhatsApp युझरला कॉलिंग करू शकतो. लवकरच हा कॉलिंग इंटरफेस बदलणार आहे. मॉडर्न कॉलिंग इंटरफेस आणखी आकर्षक हाताळायला सोपा असेल.

WhatsApp वर चॅट आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मोडवर राहतील आणि इंडिकेटरद्वारे त्याबाबतची ग्वाही युझरला सतत दिली जाईल.

WhatsApp वर लवकरच quick replies हा शॉर्टकट अॅड होईल. हा पर्याय WhatsApp Business च्या युझरना आधी दिला जाईल. यामुळे व्यावसायिक वेळोवेळी प्रीसेट रिप्लाय देऊन ग्राहकांच्या संदेशांना तातडीने प्रतिसाद देऊ शकतील. यातून ग्राहक आणि व्यावसायिक यांचा संवाद वेगवान होईल.

WhatsApp Group Admin सबलीकरण मोहिमेंतर्गत अॅडमिनच्या अधिकारांमध्ये वाढ केली जाईल. ग्रुप अॅडमिन ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने ग्रुपवर पाठवलेला मेसेज डीलीट Delet करू शकतील. यामुळे आक्षेपार्ह संदेश पाठवून तणाव निर्माण करणाऱ्यांना तसेच ग्रुपमध्ये फेक मेसेज पाठवणाऱ्यांना आळा घालणे सोपे होईल.

WhatsApp वर Communities तयार करण्याचा पर्याय लवकरच उपलब्ध होईल. ग्रुप अँडमिन वेगवेगळ्या कम्युनिटी तयार करुन त्यात सदस्यांना अँड करू शकतील.