करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

Nilesh Jadhav

करोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणूने (Corona Omicron variant) जगभरात काळजीचं वातावरण निर्माण केलंय. हा विषाणू करोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अनेक पटींनी धोकादायक असल्याचंही तज्ज्ञ सांगत आहे.

ओमिक्रॉन प्रकाराच्या पहिल्या केसची २४ नोव्हेंबर रोजी पुष्टी झाली होती. या विषाणूचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. अनेक देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. चला, तर याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात करोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूबद्दल…

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. शरीराचे तापमान वाढते. त्याची लक्षणे कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूपच वेगळी आहेत.

विषाणूला रोखण्यासाठी डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल ३ प्लाय मास्क आणि एन ९५ प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल. खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे आहे.

आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी. ओमिक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे – दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या.

या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराविरूद्ध ही लस प्रभावी आहे की नाही याबाबत लस उत्पादकांना अजूनही शंका आहे. हे शोधण्यासाठी फायझर आणि बायोएनटेक यांनी संशोधन सुरू केले आहे. ओमिक्रॉनचा लस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या अनेक लोकांना संसर्ग झाला आहे.