‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’चे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं निधन

Nilesh Jadhav

वाहन उद्योगातील अग्रणी उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने त्यांनी टोयोटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

विक्रम एस किर्लोस्कर यांनी MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये विविध महत्त्वाच्या पदांवरुन चमकदार कामगिरी केली.

विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपला पीढीजात उद्योग अधिक उंचीवर नेण्यास मोठा हातभार लावला.

किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली.