PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

Nilesh Jadhav

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एका वर्षाच्या आत आणखी एक आलिशान हॉटेल (Hotel) खरेदी केले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यूयॉर्कचे आलिशान हॉटेल मँडरीन ओरिएंटल (Luxury Hotel Mandarin Oriental) ९८१ करोड डॉलरमध्ये विकत घेतले आहे. भारतीय चलनात त्याची किंमत सुमारे ७२८ कोटी आहे.

हे हॉटेल बॉलरूम, पंचतारांकित स्पा आणि जेवणाच्या क्षेत्रांसाठी ओळखले जाते. आयरिश अभिनेता लियाम नीसन आणि अमेरिकन अभिनेत्री लुसी लियू येथे नियमित भेट देतात.

मँडरीन ओरिएंटल हॉटेल २००३ साली बांधण्यात आलं होतं. हे ८० कोलंबस सर्कलमध्ये स्थित आहे. जे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे.

मँडरीन ओरिएंटल हॉटेल प्रिस्टाइन सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कल जवळ आहे. या हॉटेलमध्ये २४८ खोल्या आणि स्यूइट आहेत. मँडरिन ओरिएंटल हे ५४ मजल्यांचे आहे.

हे हॉटेल इतके महाग आहे की त्याच्या ORIENTAL SUITE मध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे शुल्क १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही खोली ५२ व्या मजल्यावर आहे. तर सर्वात स्वस्त रुम जवळपास ५५ हजार रुपये आहे.

एका वर्षापेक्षा कमी कालावधीत रिलायन्सकडून प्रसिद्ध हॉटेलचे हे दुसरे अधिग्रहण आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिलायन्सने यूकेमधील स्टोक पार्क लिमिटेडचे ​​अधिग्रहण केले.