लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

Nilesh Jadhav

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (Genral Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) मृत्यू झाला. यानतंर आता लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Genral M M Naravne) पुढचे सीडीएस (CDS) होण्याची शक्यता आहे.

दरम्यान लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी चेअरमन ऑफ द चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा पदभार स्वीकारला आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम त्यांच्याकडे असणार आहे.

भारतीय लष्कर दलाचे प्रमुख एम एम नरवणे सर्वात वरिष्ठ असून त्यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे मोदी सरकारने संरक्षण दल प्रमुख हे पद आणण्याआधी ज्या पद्धतीने काम सुरु होतं तसंच काम सध्या सुरु राहणार आहे.

आता केंद्र सरकार जेव्हा CDS ची घोषणा करेल तेव्हा हे पद आपोआप त्यांच्याकडे जाईल. तीन प्रमुखांमध्ये वरिष्ठ असल्याने सरकार लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना सीडीएस बनवेल अशी अपेक्षा आहे.

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेतून झालं. त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (NDA) लष्कराचं शिक्षण घेतलं. तसेच, ते देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडेमीचेही माजी विद्यार्थी आहेत.

इंदौरच्या देवी अहिल्या विद्यापीठातून नरवणेंनी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एमफील केलं. मनोज नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलात अधिकारी होते. मनोज नरवणे यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. नरवणे दाम्पत्याला दोन मुली आहेत.

जून १९८० मध्ये शीख लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधून लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी सैन्यात पाऊल ठेवलं. काश्मीर आणि ईशान्य भारतात कट्टरतावाद्यांविरोधातील मोहिमांचा मोठा अनुभव आहे.