VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....

Dr. Pankaj Patil

मराठी चित्रपट सृष्टीतील ऐश्वर्या म्हणून तीची ख्याती आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील ऐश्वर्यां रॉय प्रमाणेच तीलाही सौंदर्याचे वरदान मिळाले आहे. ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी मानसी नाईक खरेरा आता पुन्हा सिंगल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला कायम ओळखले जाते. मानसी नाईकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं.

काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि प्रदीपचे एकत्र फोटोही डिलीट केले होते. त्यानंतर तिने खरेरा हे आडनावही हटवलं आहे. यामुळे ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर मानसी नाईकने या चर्चांवर अप्रत्यक्षरित्या मौन सोडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. यातील बहुतांश पोस्ट या भावूक असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे तिचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याचे बोललं जात होतं. अखेर तिने यावर भाष्य केले आहे

ती म्हणते

आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात जे तुमच्यासाठी सतत खंबीरपणे उभे राहत असतात. तुम्ही जे जसे आहात, तसे ते तुम्हाला स्वीकारतात आणि त्याबद्दल त्यांच्या मनात तुमच्याविषयीच आदरच असतो. ते तुमच्यासाठी लढतात.

तुम्हाला सहभागी करुन घेतात. तुम्हाला प्रोत्साहन देतात. काहीही झालं तरी ते तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. पण माझ्या आयुष्यात अशी काही माणसं अपवादाने आली की ज्यांनी मित्राचा बुरखा घेतलेला होता मात्र त्यांनी वरीलपैकी कोणतीही गोष्ट केली नाही.

माझ्या या कठीण काळात माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भातील माहितीचा कोणी गैरवाजवी उपयोग करत असेल तर कृपया त्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही विनंती सर्वांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आहे”, असे मानसी नाईकने यात म्हटले आहे.

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते.

पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत

मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.”

बालमित्र व पती प्रदीप खरेरा पासून विभक्त होत असतांना तीला खरोखरच दु:ख होत असल्याचे तीने सोशल मीडियावर केलेल्या एका कवितेवरून दिसून येत आहे.

तीने पोस्ट केलेली कविता अशी.

“तू अपनी खूबियां धुंध

खामिया निकालने के लिए लोग हैं ना

अगर रखना है कदम तो आगे रख,

पीछे खिंचने के लिए लोग हैं ना

सपने देखने हैं तो तो ऊंचा देख,

नीचा दिखने के लिए लोग हैं ना

तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का,

जलने के लिए लोग हैं ना

प्यार करना है तो खुद से कर

नफरत करने के लिए लोग हैं ना

तू अपनी अलग पहचान बाबा

भीड़ में चलने के लिए लोग हैं ना

तू कुछ करके दिखा दुनिया को

तालियां बजाने के लिए लोग हैं ना

धन्यवाद”