VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

Dr. Pankaj Patil

उर्वशी रौतेला गुलाबी रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये ७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. अभिनेत्री जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

पण यावेळी उर्वशीच्या आणखी एका गोष्टीनं लक्ष वेधून घेतलं. ती गोष्ट म्हणजे उर्वशीच्या गळ्यातील नेकलेस.

हा नेकलेस काही सर्वसाधारण नेकलेस नव्हता,तर तिनं मगरीच्या डिझाईनचा नेकलेस परिधान केला होता.

उर्वशीला हा मगरींचा नेकलेस गळ्यात घालणं मात्र भारी पडलं आहे. अनेकांना तिच्या गळ्यातल्या मगरी पाहिल्यावर त्या पाल आहेत असं आधी वाटलं.

 उर्वशीला तिच्या या नेकलेसवरुन लोक भले ट्रोल करत असतील पण त्याची किंमत आणि खासियत हैराण करणारी आहे.

या नेकलेसची किंमत २०० करोड इतकी आहे. हा नेकलेस फ्रान्सच्या लग्झरी फर्म कार्टियारनं बनवला आहे .

उर्वशीचा हा लूक रेड कार्पेटसाठी परफेक्ट आहे. अभिनेत्रीने केसांचा अंबाडा बनवला आहे आणि त्यासोबत तिने प्राचीन दागिनेही परिधान केले आहेत.

उर्वशीच्या नेकपीसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने ऑफ-शोल्डर गुलाबी गाउनसह कानात मोठे लूप घातले होते. जे त्याच्या नेकपीसशी जुळतात.