VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

Dr. Pankaj Patil

पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या चर्चेत आली आहे.

मानुषी तिच्या आगामी चित्रपटामुळं नाही तर, तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे.

चर्चेचं कारण म्हणजे मानुषी रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. मानुषी विवाहित उद्योगपती निखिल कामत यांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मानुषीने आतापर्यंत कधीही तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाहीर खुलासा केलेला नाही. दोघांकडूनही या वृत्तावर अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. पण आता ती भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामथ याला डेट करत आहेत.

 मानषी आणि निखिल कामत २०२१ पासून एकमेकांना डेट करत आहेत., दोघं लिव्ह इनमध्ये राहत आहेत

मानुषी आणि निखिल यांनी त्यांच्या नात्याबद्दल गुपित राखलं असंल तरी दोघेही अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्याचं समोर आलं आहे. नुकतंच दोघ एकत्र ऋषिकेशला फिरायला गेले होते

 सध्या, मानुषीला तिच्या करीअरवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मीडियासमोर खुलासा करायचा नसल्याचं सांगण्यात येत आहे.

 मानुषी आणि निखिल यांच्या कुटुंबियांमध्येही जवळचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंबीयांनादेखील त्यांच्या नात्याबद्दल तसंच त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा रंगू नये अशी इच्छा आहे.

व्यवसायिक निखिल कामथने बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरा हिच्यासोबत १८ एप्रिल २०१९ ला इटलीमध्ये लग्न केलं होतं. मात्र वर्षभरातच दोघेही विभक्त झाले.

आता तो मानुषी छिल्लरला डेट करत आहे. आता ही दोघं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे मनुषीचे चाहते लक्ष लावून आहेत.