VISUAL STORY : मानसी नाईक नंतर ही अभिनेत्री होणार पती पासून विभक्त

Dr. Pankaj Patil

आई कुठे काय करते' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हीचा आज २९ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे.

रुपाली सध्या ;आई कुठे काय करते' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसतेय. संजना बनून रुपाली घराघरात पोहोचली.

अभिनेत्री रुपाली भोसले हिने एका कार्यक्रमात आपल्या घटस्फोटामागचं कारण सांगितलं होतं.

अरुंधतीच्या संसारात विष कालवलं म्हणून अनेक प्रेक्षकांनी तिला वाईट म्हटलं. परंतु, खऱ्या आयुष्यात रुपाली अत्यंत दिलखुलास आणि प्रेमळ आहे.

नेहमी मनमोकळ्या हसणाऱ्या रुपालीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. तिचं आयुष्य हे एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी असं आहे.

रुपालीचं लग्न मोडल्यामुळे अनेकांनी तिला चुकीचं ठरवलं.

अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असताना रुपालीने लग्न केलं. त्यानंतर ती पतीसोबत लंडनला गेली.

मात्र तिथे गेल्यावर तिच्या सासरच्यांनी तिच्यावर बंधनं घालायला सुरुवात केली. भाऊ लहान असल्याने आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे याची कल्पना तिने सासरकडच्यांना आधीच दिली होती. 

त्यामुळे पतीकडून तिला सहकार्य मिळेल अशी तिला अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. उलट तिचा मानसिक छळ सुरू झाला. तिचा अभिनय बंद झाला. 

भारतात परत येण्यासाठी तिला पतीच्या आणि सासरकडच्या लोकांच्या विनवण्या कराव्या लागल्या. शेवटी रुपाली भारतात परतली.

त्यानंतर तिच्या भावाचा खूप मोठा अपघात झाला. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पुन्हा रुपालीवर येऊन पडली मात्र तिच्या पतीने साधी विचारपूसही केली नाही.

सासरच्या लोकांनी तिला एकटं पाडलं. शेवटी तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे काम शोधण्यासाठी धडपड असा तिचा प्रवास सुरू होता. 

रूपालीने सांगितलं की तो खूप खडतर काळ होता. अर्थातच आयुष्य संपवण्याचाही विचारही तिच्या मनात आला.

पण तिच्यावर अवलंबून असलेल्या आईवडीलांचं तिच्या माघारी काय होईल या विचाराने तिने स्वत:ला खंबीर बनवलं. त्यानंतर तिने पुन्हा गगनभरारी घेत स्वतःची ओळख निर्माण केली.