VISUAL STORY : मानसी अन् प्रदीप मध्ये सुरू झालेय सोशल मीडिया वॉर
Dr. Pankaj Patil
अभिनेत्री मानसी नाईक अन् तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू आहे.
मानसी अन् तिचा पती प्रदीप यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
मानसीनं याआधी प्रदीपवर आरोप करत त्याला 'गोल्ड डिगर' म्हणूनही संबोधलं होतं
प्रदीपने रडतानाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मानसीने एक पोस्ट शेअर करत त्याला अप्रत्यक्षपणे सुनावलं होतं.
प्रदीपनं फक्त पैशासाठी लग्न केलं,माझ्या जीवावरच तो लग्नानंतर जगत होता,काम करत नव्हता...असे एक ना अनेक आरोप मानसीनं केले आहेत.
यावर प्रदीपनं थेट पलटवार केला नसला तरी तो देखील सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून मानसीला सुनावण्याची एकही संधी सोडत नाही
प्रदीपनं मर्यादा ओलांडत अश्लील हावभाव करत व्हिडीओ पोस्ट केला आहे. दोघांमधील भांडण आता वेगळ्याच पातळीवर पोहोचलं असल्याचं प्रदीपच्या या व्हिडीओमधून दिसत आहे.
आता मानसीचे चाहतेच नाहीत तर सर्वसामान्य नेटकरी देखील त्याला टार्गेट करत आहेत.
“मी माझं आयुष्य सुधारेन किंवा माझं आयुष्य बिघडेल ही फक्त माझी समस्या आहे. माझ्याबद्दल कोण काय विचार करतं याची मी पर्वा करत नाही.” असं प्रदीप त्याच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
अनेकांनी तर मानसीनं अशा माणसावर प्रेम कसं केलं असा थेट सवाल केला आहे.