VISUAL STORY : या वर्षात कोणकोणत्या सेलिब्रेटींनी बांधली रेशीम गाठ

Dr. Pankaj Patil

विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूरने १४ फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशमधील शाहतलाईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी पारंपारिक पद्धतीने लग्न केलं.

फरहान अख्तर व शिबानी दांडेकरने १९ फेब्रुवारी रोजी लग्न केलं. दोघेही एकमेकांना तीन वर्षांपासून डेट करत होते.

सना कपूर आणि मयंक पाहवा यांनी २ मार्चला लग्न केलं.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतली जोडी आलिया भट्ट व रणबीर कपूरने १४ एप्रिलला लग्नगाठ बांधली.

रिचा चड्ढा- अली फजलने ४ ऑक्टोबरला लग्नगाठ बांधली.

स्टँड अप कॉमेडियन केनेथ सेबॅस्टियन आणि ट्रेसी अॅलिसन यांनी १६ जानेवारीला गोव्यात लग्न केलं

टीव्ही अभिनेता मोहित रैनाने अदितीशी १ जानेवारीला लग्न केलं होतं.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी २७ जानेवारीला लग्न केलं. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी गोव्यात लग्नगाठ बांधली.

करिश्मा तन्ना हिने तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेराशी ५ फेब्रुवारीला लग्न केलं होतं.