VISUAL STORY : ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव

Dr. Pankaj Patil

झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून सायली संजीवने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही तिची पहिली मालिका होती.

या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

सध्या सायली तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. तिचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत नेहमीच जोडलं जातं.

मध्यंतरी सायलीच्या पोस्टवर ऋतुराजविषयी कमेंट केल्या होत्या. आता तिने अखेर या चर्चांवर मौन सोडलं आहे.

सायली आणि ऋतुराज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला असताना एका मुलाखतीत सायलीला ऋतुराज सोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं.

सायलीने दिलेल्या उत्तराकडे सर्वांना थक्क केलं आहे. ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर सायली म्हणाली, 'जेव्हा आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला.

आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलू देखील शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे देखील मला माहित नव्हतं...'

पुढे सायली म्हणाली, 'आमच्या वयाबद्दल देखील सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. मी 29 वर्षांची आणि ऋतुराज 25 वर्षांचा आहे. आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता आमच्यात गप्पा होत नाहीत.' अशा भावना सायलीने व्यक्त केल्या आहेत.

सायलीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे ऋतुराज आणि तिच्या नात्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.