VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Dr. Pankaj Patil

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणारा चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा थाटामाटात पार पाडला

हा शाही सोहळा दिल्ली येथील कपूरथला हाऊस या ठिकाणी पार पडला. या साखरपुड्यासाठी सिनेसृष्टी आणि राजकारणातील १०० हून अधिक लोक उपस्थित होते.

या सोनेरी दिवशी परिणितीने ऑफव्हाईट ड्रेस परिधान केला होता. या सुंदर ड्रेस परिणिती खूपच सुंदर दिसत होती. या सिंपल ड्रेसवर मोत्यांचा साज करण्यात आला होता.

या फुल स्लिव्हज ड्रेसच्या हातांना देखील सिल्वर आणि मोत्यांनी सुंदर नक्षी काम करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा यांनीही हजेरी लावली.

परिणितीने मिनिमल मेकअप आणि मांगटिका आणि अंगठी घालून तिचा लुक पूर्ण केला

या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये परिणीती हे गाणं गात असताना दुसरीकडे राघव तिला गालावर किस करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :- @parineetichopra)

राघवच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या क्युट व्हिडीओ मधून त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येते.

आप चे खासदार राघव चड्ढा यांनी नुकतंच सोशल मीडियावर साखरपुड्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे. यावेळी राघव यांनी सुद्धा परिणितीच्या ड्रेसला सुट होतील असे ऑफव्हाईट रंगाचा सुट परिधान केला होता.

या फोटोमध्ये दोघांच्या अंगठ्या देखील पाहायला मिळत आहेत. यावेळी परिणितीच्या हातामध्ये हिऱ्यांची अंगठी पाहायला मिळत आहे. तर राघव चड्ढा यांच्या हातामध्ये सोन्याचा बॅन्ड पाहायला मिळत आहे