VISUAL STORY :केवळ तुनिषाचं नव्हे तर 'या' अभिनेत्रीनींही संपवलं आयुष्य..

Dr. Pankaj Patil

अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली

तुनिषा शर्मा

टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने 24 जानेवारी 2020 रोजी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येने इंडस्ट्रीला धक्का बसला.

सेजल शर्मा

डर्टी पिक्चर चित्रपटाने साऊथची आयटम गर्ल सिल्क स्मिताला बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध केले. 17 वर्षे 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या स्मिताने चित्रपटाची निर्मिती सुरू केली आर्थिक समस्या आणि नैराश्यामुळे त्यांनी 23 सप्टेंबर 1996 रोजी चेन्नई येथे आपले जीवन संपवले.

सिल्क स्मिता

टीव्ही मालिका बालिका वधू अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने तिची कारकीर्द गाजत असताना आत्महत्या केली. झलक दिखला जा (सीझन-5), बिग बॉस, ससुराल सिमर का यासह काही टीव्ही मालिका तिची ओळख बनली होती. 1 एप्रिल 2016 रोजी ती घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला.

प्रत्युषा बॅनर्जी

मिस इंडिया नफिसा जोसेफ ही एक प्रसिद्ध मॉडेल होती. २६ वर्षीय नफिसा तिचा प्रियकर उद्योगपती गौतम खंडुजासोबत लग्न करणार होती. पण लग्नाआधीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं नफिसाला हे सहन झाले नाही आणि तिने 29 जुलै 2004 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

नफिसा जोसेफ

मॉडेल, अभिनेत्री आणि कथ्थक नृत्यांगना शिखा जोशीने 2013 मध्ये बीए पास या चित्रपटात काम केले होतं. काही प्रोजेक्टमधून काढून टाकणे, प्रेमात आलेले अपयश यामूळं शिखा नैराश्यात गेली. 16 मे 2015 रोजी त्यांनी मुंबईतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

शिखा जोशी

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री कुलजीत रंधावाने 8 फेब्रुवारी 2006 रोजी तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपला जीव दिला होता. 'रिश्ते', 'आहट', 'सरहदें', 'कहता है दिल', 'कुमकुम: एक प्यारा सा बंधन', 'कोहिनूर' यांसारख्या मालिकांमधून तिनं यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

कुलजीत रंधावा

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासोबत 'निशब्द' आणि 'गजनी' चित्रपटात दिसलेल्या जिया खानने 3 जून 2013 रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. निशब्दमध्ये ती पहिल्यांदा दिसली. तिच्या आत्महत्येचं कारण अदयापही स्पष्ट नाही.

जिया खान