VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

Dr. Pankaj Patil

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिचे निधन झाले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. यानंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

तिच्या निधनानंतर तिच्या इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. यात तिने तिचा बॉयफ्रेंड सब्यसाची चौधरी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सब्यसाची चौधरी याचा वाढदिवस ३१ ऑक्टोबरला असतो. यानिमित्ताने एंड्रिलाने एक पोस्ट शेअर केली होती.

एंड्रिलाने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ते दोघेही आनंदात दिसत आहे.

यात तिने “माझ्या जगण्याचे कारण…” अंस कॅप्शन देत सब्यसाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

एंड्रिलाची ही पोस्ट २० दिवसांपूर्वीची आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. एंड्रिलाच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

तिचे चाहते विविध पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.