VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

Dr. Pankaj Patil

मराठीतील ऐश्वर्या म्हणून तीच्या कडे पाहीले जाते. तर बाई वाड्यावर या या गाण्यातून ती घराघरातच नव्हे तर अनेकांच्या दिलाच्या धडकन पर्यत ती पोहचली. त्यामुळे अनेक तरूण वरमाला घेवून उभे होते.

मात्र तीने तीचा लहाणपणापासून असलेल्या बॉय फ्रेडशी लगीनगाठ बांधली. नव्याने नऊ दिवसांप्रमाणे प्रदील खरेरा सोबत मानसीची विवाहगाठ टिकली. आता ते दोघेही विभक्त झाले आहे. ब्रेकअपचे मनात दु:ख असल तरी आता तीने पुनश्च हरीओम म्हणून अभिनयासह सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे.

मानसीने निळ्या लेहंगा आणि लाल दुपट्टा घेऊन अगदी नववधू लुक केला आहे. बनारसी निळा लेहंगा आणि लाल बांधणीची ओढणी अत्यंत सुंदर दिसत आहे.

मानसीने डोक्यावरून घेतलेला या लाल दुपट्ट्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी काढण्यात आली आहे. तर पिवळ्या आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन खूपच आकर्षक दिसतेय.

पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेल्या काचेच्या लाल निळ्या बांगड्या मानसीने यासह स्टाईल केल्या आहेत. संपूर्ण हातभर तिने हा चुडा घातला आहे.

लाल खडे जडवलेली अशी मोठी राजस्थानी नथनी, गोल्डन बिंदी, गोल्डन रेड चोकर, कुंदनचे निळे कानातले मॅच करत तिने दागिन्यांची स्टाईल केली आहे

मानसीच्या या लुकमुळे पुन्हा मानसी लग्न करते की काय असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. संपूर्ण नववधूच्या लुकमुळेच गोंधळ उडालेला दिसून येतोय.

मानसीने गडद मेकअपचा आधार घेत डार्क राणी कलरची लिपस्टिक, हायलायटर, रूझ आणि आयशॅडोचा वापर केला आहे.

लाल टिकली ही नववधूची खासियत असते आणि कपाळाच्या मध्यभागी भरीव लाल टिकली लावत मानसीने हा लुक पूर्ण केलाय.

आता तीने नववधुसारखा पोशाख करून ते फोटो सोशल मीडियावर टाकले आहे. त्यावरुन ती आता कोणासोबत पुन्हा बोहल्यावर चढणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मात्र खरे कारण काही वेगळेच आहे. मानसीने आता नुकतेच नवे घर घेतले आहे. या नव्या घरात तीने परिवारासह गृहप्रवेश केला. त्यावेळी मानसीने हा नववधुसारखा पोशाख केला आहे.