VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता

Dr. Pankaj Patil

हिंदी आणि मराठीसृष्टीत अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी उत्तमरित्या स्त्री पात्र साकारलं आहे. आता पुन्हा एक लोकप्रिय अभिनेता त्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी.

तो त्याच्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्याचा पहिला लूक आउट झाला होता. तेव्हा तो नवाजुद्दीन आहे असा विश्वास कोणालाही बसला नाही

नवाजुद्दीनचा ‘हड्डी’ लूक पाहून प्रेक्षकांना अश्चर्याचा धक्का बसेल. त्याची ओळख पटवणे खूप कठीण होत आहे. अप्रतिम परिवर्तन घडले आहे. मोशन पोस्टरमध्ये तो ग्लॅमरस केस आणि मेकअपसह ग्रे कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

अनेक चाहत्यांनी याचे वर्णन 'एपिक लूक' असे केले आहे. अनेकांना तो एका नजरेत अर्चना पूरण सिंगसारखा दिसतो. तुमचीही क्षणार्धात फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही त्याला अर्चना समजू शकता. सर्वजण नवाजुद्दीनच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा लूक पाहून चाहते 'हड्डी' चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, याबाबत अद्याप फारसा खुलासा झालेला नाही. सध्या त्याचे शूटिंग सुरू असून पुढच्या वर्षी रिलीज करण्याची तयारी सुरू आहे

हुडी हा चित्रपट ट्रान्सजेंडरवर फोकस करणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटात 80 ट्रान्सजेंडरसोबत काम केले आहे. ट्रान्सजेंडरसोबत काम करणे हा माझा सन्मान आणि भाग्य असल्याचे नवाजने म्हटले आहे

हुड्डीमध्ये ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना नवाज म्हणाला, ‘हुड्डीसाठी खऱ्या ट्रान्सजेंडरसोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. सिनेमाच्या माध्यमातून मला ट्रान्सजेंडर समुदायाला समजून घेण्याची आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्याची संधी मिळाली.’