VISUAL STORY :सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा

Dr. Pankaj Patil

मराठी मनोरंजन विश्वातील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा होता.

आता मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यानं दिलेली गुड न्युज नेटकऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे.

हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से आमीर है....टाईमपासमध्ये दगडु अर्थात प्रथमेश परब हा भलताच लोकप्रिय झाला होता.

काहीही झालं तरी प्राजक्ताशी लग्न करायचचं अशा इराद्यानं तिच्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या प्रथमेशनं आता एक गोड बातमी दिली आहे.

ती बातमी त्यानं सोशल मीडियातून व्हायरल केली आहे. तो आता लग्न करायचं म्हणतोय.

लग्नाची पत्रिकाही त्यानं शेयर केली आहे. पण गुरुवारपर्यत कळ काढा....असेही त्यानं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे..

प्रथमेशनं त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो नवरदेव झाला आहे.

शेरवानी परिधान करत डोक्याला मुंडावळ्या बांधत हातात हार घेऊन प्रथमेश फोटोत उभा आहे. त्याने लग्नाचं थेट आमंत्रणही दिलंय.

प्रथमेश लग्न करणार असल्याचे वाचून आणि ऐकून त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. त्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

“सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा!”, असं म्हणत प्रथमेशने तो फोटो शेअर केला आहे.

क्षितिजा घोसळकर हिच्याबरोबर प्रथमेशने फोटोशूट केलं आहे. आपण क्षितीजाला डेट करत असल्याचं प्रथमेशने उघडपणे अजूनही सांगितलेलं नाही.