Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'

Dr. Pankaj Patil

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण. आज त्यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.

रणवीर आणि दीपिका या दोघांनी एकमेकांना जवळपास ६ वर्ष डेट केलं

‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका-रणवीरने एकत्र काम केले.

रामलीला’ चित्रपटापासूनच दीपिका-रणवीरच्या लव्हस्टोरीला खऱ्या अर्थाने सुरु झाली.

दीपिका आणि रणवीरला एकत्र आणण्यास संजय लीला भन्साली यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले जाते.

रामलीला’ चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं असलं तरी त्या दोघांची पहिली भेट सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती.

यशराज स्टुडिओमध्ये दीपिका एकदा शूटिंग करत असताना तिथे रणवीरही आला होता. ही त्यांची दुसरी भेट होती. यावेळी दोघे पहिल्यांदा एकमेकांशी बोलले होते, असा खुलासा खुद्द दीपिकाने केला होता.

रणवीर त्यावेळी अन्य एका मुलीला डेट करत असतानाही माझ्याशी फ्लर्ट करत होता. बराच काळ गेल्यानंतर मी त्याला तू माझ्या फ्लर्ट करतो आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने अजिबात नाही असं उत्तर त्याने दिलं.

त्याचं हे उत्तर ऐकून दीपिकाने ठामपणे तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस, असं सांगितलं.

यानंतर ‘रामलीला’ चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी दोघं संजय लीला भन्साळींच्या घरी भेटले होते.

आधी कोंकणी आणि मग सिंधी पद्धतीनं दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा पार पडला. (फोटो – साभार सोशल मीडिया)

रणवीर आणि दीपिका १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये विवाहबंधनात अडकले.