VISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज

Dr. Pankaj Patil

चित्रपट सृष्टीत करीअर करावयाचे असल्यास प्रचंड मेहनत घ्यावी लागते. केवळ स्टार किड्स आहे म्हणून अभिनय किंवा संवादाचे गारूड चाहत्यांच्या मनावर चालेल असे नाही. अशीच एक नवोदित स्टार किड अभिनय क्षेत्रात आता करिअर करू पाहत आहे. तीच नाव आहे श्रिया पिळगावकर. होय अभिनेते सचिन पिळगावकर याची ती कन्या.

श्रियाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे. तिने तिच्या

करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.

श्रिया ने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं

मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही तिने केल्या आहेत.

अभिनय जगतातील हा नवा चेहरा फार कमी काळातच लोकप्रिय झाला आहे.

श्रियाने आता तिचं एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या फोटोशूटमध्ये

श्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे

तिने तिचे काही लाल ड्रेसमधील फोटो शेअर केलेत

श्रियाचा हा कॅज्युअल पण हटके अंदाज पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय

मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे

शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती

‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमधील तिची भूमिकाही प्रचंड गाजली होती