Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

Dr. Pankaj Patil

श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आरोपी आफताब पूनावालाने आपली लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकर हिचा गळा दाबून खून केला.

त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते जंगलामध्ये फेकून दिल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. दिल्लीमधील या हत्याकाडांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

यावर राजकीय नेते तसेच बॉलिवूड सेलिब्रेटी सर्वांनीच आपल्या प्रतिक्रिया देत आफताबला शिक्षा व्हावी आणि श्रद्धाला न्याय मिळावा याची मागणी केली आहे. अशात आता बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने या प्रकरणावर केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

कमाल आर खानने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना कमाल आर खानने एक ट्वीट केलं आहे. त्याने श्रद्धाचा मारेकरी आफताब पुनावाला शिक्षा व्हावी अशी मागणीही केली आहे.

केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, “सौदी अरेबियामध्ये आफताब अमीन पूनावालासारख्या अपराध्यांना रस्त्याच्या मधोमध उभं केलं जातं आणि जनता त्याला दगड मारते. तो अपराधी मरत नाही तोपर्यंत त्याच्यावर दगड मारले जातात. त्यामुळे त्या देशात असं कोणी वागत नाही.

केआरकेच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला सहमती दर्शवली आहे तर काहींचं म्हणणं आहे की, “सौदी अरेबियामध्ये शरिया कायदा आहे आणि भारत एक पुरोगामी देश आहे.