Visual Story # प्रेमासाठी १२ वर्ष अन् करीअर साठी मुंबईत स्ट्रगल

Dr. pankaj patil

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

राजू त्यांच्या कॉमेडीसह, अभिनयासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होते

त्यांची लव्ह स्टोरीही एखाद्या फिल्मी लव्ह स्टोरीसारखीच आहे. आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल १२ वर्ष वाट पाहिली होती. १२ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना त्यांचं पहिलं प्रेम मिळालं होतं

शिखा (Shikha Srivastava) असं त्यांच्या पत्नीचं नाव असून भावाच्या लग्नात पहिल्या नजरेत त्यांना शिखाशी प्रेम झालं होतं.

त्यांच्या भावाच्या लग्नातच त्यांना त्यांचंही प्रेम मिळालं. मोठ्या भावाच्या लग्नात राजू यांनी शिखाला पाहिलं आणि पहिल्या नजरेतच त्यांना प्रेम झालं

राजू १९८२ मध्ये मुंबईत आले. मुंबईतही नाव कमावण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यानंतर काही वर्षात राजू इथे सेटल होऊ लागले आणि आता लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

राजू शिखाशी पत्राद्वारे संपर्कात राहायचे पण थेट कधी बोलणं झालं नाही शिखानेही कधी खुलेपणाने तिचं उत्तर दिलं नाही. एक दिवस त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने शिखाच्या घरी याबाबत बोलणी केली.

शिखाचा भाऊ मलाडमध्ये त्यांचं घर पाहण्यासाठी आले. इथेच त्यांचं लग्नही ठरलं. त्यानंतर १७ मे १९९३ मध्ये राजू आणि शिखा यांचं लग्न झालं. या दोघांची अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुलं आहेत