राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

Nilesh Jadhav

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली आणि अफाट लोकप्रियता मिळविलेली मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. (Tuzhat jeev rangala)

Photo : @akshayaddr/IG

या मालिकेतील राणा आणि पाठकबाईं या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतला होता. या जोडीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

Photo : @akshayaddr/IG

आता या जोडीने खऱ्याआयुष्यात साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिले आहे.

Photo : @akshayaddr/IG

हार्दिक (Hardik Joshi) आणि अक्षयाने (Akshaya Deodhar) सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.

Photo : @akshayaddr/IG

अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर (Instagram) साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, फायनली एंगेज.

Photo : @akshayaddr/IG

साखरपुड्यावेळी अक्षयाने पिच रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केलेला पाहायला मिळतो आहे.

Photo : @akshayaddr/IG

तिला मॅचिंग असा गेटअप हार्दिकनेही केला आहे. त्याने पिच रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे.

Photo : @akshayaddr/IG

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या जोडीची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

Photo : @akshayaddr/IG

या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती , पण याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं.

Photo : @akshayaddr/IG

परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे.

Photo : @akshayaddr/IG