Visual Story श्रध्दा कपूरचा ट्रॅडिशनल लुक

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात.

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram account) आपले काही फोटो श्रध्दाने शेअर केले आहेत.

सर्वत्र दिवाळी (diwali) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, सर्व सामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वांमध्येच दिवाळीचा आनंद दिसून येत आहे.

मागील तीन वर्षात कोरोना (corona) संसर्गामुळे सण उत्सवांवर निर्बंध आले होते, यंदा मात्र सर्व सण निर्बंधमुक्त झाल्याने नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

श्रद्धा कपूरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ऑरेंज कलरच्या लेहेंग्यामध्ये फारच सुंदर दिसत आहे.

कपाळावर टिकली आणि गळ्यात चोकर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत आहेत.

श्रद्धा कपूरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो-सोशल मीडिया साभार)