मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Nilesh Jadhav

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma)गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कॉमेडी शोमध्ये बॉलिवूडसह अनेक क्रिकेटपटू दिग्गज कलाकारांनी हजेरी लावलीये.

नुकतंच या कार्यक्रमात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आली होती. मात्र यादरम्यान सोनालीने कपिलला चांगलेच झापलं आहे. सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.

कपिलने रवी किशन, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचे शोमध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. हसत खेळत सोनाली म्हणते की अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही तिला या शोमध्ये येण्याची कधी संधी मिळाली नाही. यावर कपिल म्हणतो की सोनाली या शोमध्ये आली हे त्याचं भाग्य आहे.

यावर सोनालीने प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'कपिल फक्त हिंदी- इंग्रजीतच का बोलतोस? मराठी पण बोल. त्यावर कपिल त्याला मराठी बोलता येत नसल्याचं सांगतो. मुंबईत राहूनही त्याला ही भाषा येत नसल्याने सोनालीने त्याला झापलं.