Visual Story : मोस्ट अवेटेड 'KGF Chapter 2' चे गाणे 'या' दिवशी होणार रिलीज

Aniruddha Joshi

KGF Chapter 1 च्या अभूतपूर्व यशानंतर आता KGF Chapter 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

आता कन्नड सुपरस्टार यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. KGF Chapter 2 चित्रपटातील एक गाणं लवकरच रिलीज होणार आहे. या पहिल्या गाण्याचे नाव आहे 'तुफान'.

KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.

फरहान अख्तर, KGF Chapter 2 च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2 ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथं चित्रपटाचा पहिला भाग संपला होता.

KGF 2 मध्ये रॉकी त्याच्या आईला दिलेलं वचन पूर्ण करताना दिसणार आहे. ‘KGF 2’ मध्ये गरीबांना मदत करताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन KGF 2 मध्ये पंतप्रधानाची भूमिका साकारत आहे. यासोबतच श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

संजय दत्त मुख्य खलनायक अधीराच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तचा ‘अधीरा’ लूक याआधीच समोर आलाय. अधीरा आणि रॉकी हे KGF Chapter 2 चे मुख्य आकर्षण आहेत.