अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी, 'इतक्या' कोटीचे रक्कम आणि दागिने लंपास

Nilesh Jadhav

अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) आणि तिचा पती आनंद आहुजा (anand ahuja) यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या दिल्लीतील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातून १.४१ कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.

याप्रकरणी सोनम कपूरच्या सासूने तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या हाय-प्रोफाइल चोरीमुळे, दिल्ली पोलिसांनी तपास पथके तयार केली आहेत.

सोनमचे सासरे हरीश आहुजा आणि सासू प्रिया आहुजा दिल्लीत आनंदची आजी सरला आहुजासोबत अमृता शेरगिल मार्गावर राहतात. ही तक्रार २३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

सोनमच्या घरात २५ नोकरांशिवाय ९ केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारीही काम करतात. पोलीस सर्वांची चौकशी करत आहेत.

क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे. आता पर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गुप्त ठेवले होते. मात्र, हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.