Nilesh Jadhav
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली.
कंगना राणौत या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारते आहे. आता या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात तो अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारत आहे.
श्रेयसनं इन्स्टाग्राम अकाउंटवरून इमर्जन्सी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. ही पोस्ट शेअर करताना श्रेयसनं 'घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।' या अटलजींच्या कवितेतील ओळी लिहिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा लूक रिलीज करण्यात आला होता. अनुपम हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत.
काही दिवसांपूर्वी कंगनाने ‘इमर्जन्सी’चा टीझर शेअर केला होता. या टीझरने अनेकांचे लक्ष वेधले. इमर्जन्सी चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनाची आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे.