Aniruddha Joshi
अभिनेत्री शर्मिला टागोर ११ वर्षानंतर हिंदी सिनेसृष्टीत मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
आगामी गुलमोहर या चित्रपटातून त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
या चित्रपटात शर्मिला बत्रा कुटुंबातील आईच्या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अमोल पालेकर, मनोज वाजपेयी, सुरज शर्मा, आणि सिमरन ऋषी बग्गा यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अर्पिता मुखर्जी आणि राहुल चित्तेला यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
शर्मिला टागोर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९६०-१९७० या काळात त्यांचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये गाजले.
छोटे नवाब म्हणून ओळख असलेल्या सैफ अली खान यांच्या त्या मातोश्री आहेत.
शर्मिला टागोर यांनी आतापर्यंत अमरप्रेम, आराधना, अपुर संसार, एन इव्हिनिंग ईन पॅरिस, आ गले लग जा, काश्मीर की कली चुपके चुपके, सावन की घटा, सफर या चित्रपटातील त्यांचे दमदार अभिनय आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत.
११ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शर्मिला टागोर त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा नव्याने उमटवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
सलिल परांजपे, नाशिक.