शाहरुखच्या लेकाने करण जोहरची 'ती' ऑफर धुडकावली

Aniruddha Joshi

अनेक स्टारकिड्सला आपल्या चित्रपटातून लॉंच करणारे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांना शाहरुख खानचा मुलगा आर्यन याने मोठा धक्का दिला आहे.

photo : @___aryan___/IG

करणने आजवर धर्मा प्रोडक्शन्सच्या मध्यमातून अनेक स्टारकिड्सना चित्रपटात संधी दिली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्याच्या चित्रपटातून लॉंच करायचा दिग्दर्शक करण जोहरचा विचार होता.

Photo : @karanjohar/IG

करणने आर्यनला एका चित्रपटासाठी ऑफरदेखील दिल्याची माहिती मिळत आहे. मात्र आर्यनने करणच्या त्या ऑफरला धुडकावून लावले आहे.

photo : @___aryan___/IG

आर्यन सध्या ऑफर नाकारत आहे मात्र नंतर तो होकार देईल, असे करणला वाटत होते. त्यामुळे करणने अनेकदा आर्यनला चित्रपटाबद्दल विचारणा केली. आर्यनने दरवेळेस करणच्या ऑफरला नकार दिला आहे.

photo : @___aryan___/IG

केवळ करणच नव्हे तर झोया अख्तरनेही आर्यनला एक ऑफर दिल्याचे समजते. मात्र आर्यनने ती ऑफरही नाकारल्याची माहिती मिळत आहे.

photo : @___aryan___/IG

आर्यन खानला अभिनयात आवड नसून त्याला दिग्दर्शनात आपले करिअर घडवायचे आहे. त्यामुळे आता शाहरुखनंतर त्याची मुलगी सुहाना खानच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकेल अशी चर्चा आहे.

photo : @___aryan___/IG