'सलमान खानची' सुरक्षा वाढवली; काय आहे कारण?

Nilesh Jadhav

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सिद्धू मूस वाला हत्याकांडात (Sidhu Moose Wala’s murder) लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) प्रमुख आरोपी म्हणून समोर आल्यानंतर सलमान खानची एकूण सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई याने या आधी सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे आता यंत्रणा आणखी सक्रिय झाली आहे आणि सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Lawrence Bishnoi and Salman Khan News)

दरम्यान लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणामुळे सलमान खानला ठार मारण्याची योजना जोधपुर येथे आखली होती. लॉरेन्स बिश्नोई २०१८ मध्ये कोर्टाबाहेर म्हणाला होता की, 'आम्ही सलमान खानला मारून टाकू,'