बॉक्स ऑफिसवर RRR चा दबदबा; The Kashmir Files ला जोरदार टक्कर

Nilesh Jadhav

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आरआरआर (RRR movie) हा सिनेमा अखेर रिलीज झालाआहे. रौद्रम रणम रुधिरम असं या सिनेमाचं पूर्ण नाव आहे.

आरआरआर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घातलाय.

सिनेमामध्ये आलिया भट, ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आणि अजय देवगण यांनी काम केलं आहे. या सर्वांची कामं प्रेक्षकांना खूपच भावली आहेत.

सोशल मीडियावर प्रेक्षकांनी सिनेमाशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. अनेक युझर्सनही हा सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं आहे.

या चित्रपटानं रिलीजच्या दिवशी १२५ कोटींचा व्यवसाय केलाय. दरम्यान, आगामी काळात या चित्रपटाची कमाई अनेक पटीनं वाढणार असल्याचं बोललं जातंय. ज्याचा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यातच आलाय.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटापूर्वी फक्त विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट गाजत होता. पण, आता २५ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या RRR चित्रपटानं पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत.

कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं एक वेगळीच मजल मारलीय. समीक्षकांनी या चित्रपटाला ३.५ स्टार दिले, पण त्याची कमाई पाहता या चित्रपटासाठी १० स्टारही कमी झाले असते असं वाटतं. कारण, प्रेक्षक या चित्रपटाचं खूप कौतुक करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, RRR हा चित्रपट तयार करण्यासाठी ४०० कोटी रूपये खर्च करण्यात आले. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआरनं ४५ कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

तर आलियनं ९ कोटी मानधन घेतलं. अजय देवगणनं या चित्रपटात कमी वेळासाठी स्क्रिन शेअर करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी २५ कोटी फी घेतली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा १९२० चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.