दहशतवाद्यांसह अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडणाऱ्या 'सुपरकॉप'ची कहाणी मोठ्या पडद्यावर; रोहित शेट्टीची घोषणा

Nilesh Jadhav

रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने नुकतीच त्याच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया (Rakesh Maria) यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.

रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने (Reliance Entertainment) या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे.

आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी १९८१ च्या बॅचमधून सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली.

राकेश मारिया हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. राकेश मारियांनी आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत दहशतवादाविरुद्ध मोठी लढाई लढली आहे.

१९९३ साली मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटापासून ते २६/११ हल्ल्यापर्यंत राकेश मारियांनी आपलं काम चोखपणे करुन दाखवलं आहे.

दरम्यान रोहित शेट्टी राकेश मारिया यांच्यावर सिनेमा काढत आहे हे कळल्यानंतर आता त्यांची भूमिका सिनेमात कोणता हिरो साकारणार ते कसाबविषयी आणखी कोणते खुलासे होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.