Nilesh Jadhav
मागील अनेक दिवसांपासून नव्हे वर्षांपासून चर्चेत असलेले जोडपं म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांचं (Ranbir Kapoor) लग्न अखेर पार पडलं आहे.
पंजाबी रितीरिवाजांनुसार जवळच्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये आलिया आणि रणबीरने वास्तू बंगल्यात सात फेरे घेतले. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते.
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
हे फोटो शेअर करत “आज आमच्या कुटूंब आणि मित्रमंडळींनी समोर घरी… – बाल्कनीतील आमच्या आवडत्या ठिकाणी…आम्ही पाच वर्षे पूर्ण केली. आज आम्ही लग्न केले. आमच्यासोबत बऱ्याच आठवणी असताना आता आणखी आठवणी तयार करण्यासाठी प्रतिक्षा करू शकतं नाही…
आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया”, असे कॅप्शन आलियाने दिले आहे.
सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या क्यूट कपलवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्स यांच्याकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. यामध्ये नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, शाहीन भट्ट, करीना कपूर, सोनी राजदान, रीमा जैन, करिश्मा कपूर आणि करण जोहर यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
रणबीर कपूर आणि आलिया अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. दोघांनीही खुलेपणाने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले.
दोघांची प्रेमकहाणी निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सेटवर घडली. आलियाने स्वतः सांगितले होते की, २००५ मध्ये तिने रणबीर कपूरला पहिल्यांदा पाहिले होते आणि ती पहिल्यांदाच रणबीरला हृदय देत होती.
आलियाने सांगितले की, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी ऑडिशन देत होती, जेव्हा रणबीर तेथे सहाय्यक म्हणून काम करत होता.