बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. रणबीर-आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख ठरली?

Nilesh Jadhav

बॉलिवूडची सर्वात चर्चित कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) हे २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहे.

अनेक कार्यक्रमात दोघंही एकत्रित हजेरी लावतात. आता हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding)

१७ एप्रिलला रणबीर आणि आलिया सात फेरे घेणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु आहे. त्यामुळे दोघांचे चाहते सुद्धा त्यांचा लग्नासाठी आतुर झालेले पाहायला मिळत आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding date)

तसेच रणबीर आणि आलिया याचा विवाह सोहळा कपूर कुटुंबाचे (Kapoor Family) वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये (RK House) पार पडणार असल्याची चर्चा आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Place)

या शाही लग्नाला त्यांच्या लग्नाला ४५० पाहुणे असतील, तसेच मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) त्यांचे लग्नाचे पोषाख तयार करणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता लग्न फार लांबणीवर न नेता, लवकरच या दोघांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहे.

संपूर्ण बॉलीवूडमध्ये या जोडीच्या लग्नाची ( Alia Bhatt Ranbir Kapoor April Wedding) चर्चा सुरू आहे.

रणबीर आणि आलिया सध्या ब्रम्हास्त्र (Bramhastra) चित्रपटाच्या (Alia Bhatt Ranbir Kapoor Upcoming Movie) चित्रीकरणात व्यस्त आहे. हल्लीच ते चित्रीकरण करत असल्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते