प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे.

राजू श्रीवास्तव यांना राजधानी दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल (AIIMS) करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव राहत असलेल्या हॉटेलमधील जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या.

व्यायाम करत असतानाच राजू श्रीवास्तव जमिनीवर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं.

सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. त्यांनतर त्यांना रुग्णलयातून घरी सोडण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.