Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

महाराष्ट्राची (maharastra) लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) नुकत्याच एका अरंगेत्रम कार्यक्रमाला पाहुणी म्हणून गेली होती.

प्राजक्ता अभिनेत्री होण्याआधी ती उत्तम भरतनाट्यम डान्सर (Bharatnatyam dancer) आहे.

भरतनाट्यम प्राजक्ताचं पहिलं प्रेम आहे. तिनं केवळ नृत्याचं शिक्षणच घेतलं नाही तर त्या शिक्षणाचा फायदा करून तिनं स्वत:ची डान्स अकॅडमी (Dance Academy) देखील सुरू केली.

प्राजक्ताचं संपूर्ण शिक्षण पुण्यात (pune) झालं. तिचं संपूर्ण शिक्षण हे नृत्यात झालं आहे.

पुण्याच्या ललित कला केंद्रातून प्राजक्तानं नृत्याच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. म्हणजेच तिनं नृत्यात विशारद आणि अलंकार केलं आहे.

प्राजक्ताला अभिनेत्री व्हायचं नव्हतं पण नृत्य करत असताना तिला काही ऑफर्स मिळत गेल्या आणि तिनं कामाला सुरूवात केली.

प्राजक्तानं फार लहान वयात स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली.

प्राजक्तानं वयाच्या 10 व्या वर्षी भरतनाट्यम शिकायला सुरूवात केली. तिच्या नृत्य शिक्षणात तिच्या आईचा फार मोठा वाटा आहे. प्राजक्ता नववीत असताना तिचं विशारद झालं. बारावीत असताना तिचं अरंगेत्रम पूर्ण झालं.

बारावीनंतर प्राजक्ताला आईनं सायन्स घ्यायला सांगितलं होतं. पण प्राजक्ताला ते मान्य नव्हतं. तिला आर्ट्समध्ये शिक्षण घ्यायचं होतं. कारण तिनं अनेक वर्ष नृत्यात शिक्षण घेतलं होतं आणि ते तिला वाया जाऊ द्यायचं नव्हतं.

प्राजक्ता पुण्याच्या एका शाळेत डान्स शिकवायला लागली. त्यानंतर तिनं स्वत:ची अकॅडमी सुरू केली. नृत्यांगण अकॅडमी फॉर भरतनाट्यम नावानं प्राजक्तानं पुण्यात तिची अकॅडमी सुरू केली.

नृत्यांगण अकॅडमी फॉर भरतनाट्यमच्या आता पुण्यात 7 शाखा आहेत. प्राजक्ताच्या विद्यार्थीनी आता त्या शाखा चालवतात.