Parineeti-Raghav Wedding Photo : राघव-परिणितीच्या लग्नाचे खास फोटो पाहिलात का?

Nilesh Jadhav

आप खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये झाला.

PC : @parineetichopra/IG

सर्व नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या सोबतीने त्यांनी जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा कायमचे एकत्र झाले आहेत.

PC : @parineetichopra/IG

आता ज्या क्षणाची दोघांच्या चाहत्यांना आतुतेने प्रतिक्षा करत होते तो आलाय. राघव आणि परिणीती चोप्राने दोघांच्या लग्नाचे काही गोड क्षण चाहत्यांसोबत शेयर केले आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PC : @parineetichopra/IG

या फोटोंना परिने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये ती लिहिते की, 'आम्ही नाश्त्याच्या टेबलवर पहिल्यांदा गप्पा मारतांना, आमच्या मनाला याबद्दल माहिती झालं होतं....मी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

PC : @parineetichopra/IG

मिस्टर आणि मिसेस बनल्याचा आम्हा दोघांना खूप आनंद झाला आहे. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. Our forever begins now!'

PC : @parineetichopra/IG

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. परिणीतीने या दिवशी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला बेज रंगाचा लेहेंगा पिरधान केला होता. तर यासोबत जुळणारे सुंदर दागिने घातले होते.

PC : @parineetichopra/IG