Nilesh Jadhav
फॅशनचा सर्वात मोठा इव्हेंट मेट गाला २०२२ (Met Gala Fashion Week) सुरू झाला आहे.
हॉलिवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवर एकापेक्षा जास्त डिझायनर पोशाख परिधान करून त्यांच्या पोशाखांची चमक दाखवत आहेत.
मात्र सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालिका आणि आदर पूनावाला यांच्या पत्नी नताशा पूनावाला यांनी आपल्या लूकने संपूर्ण मेळाव्याचे लक्ष वेधले आहे.
नताशाने आपल्या लूकमध्ये आर्टिस्टिक ग्लॅमर ऍड केलं होतं. नताशाने रेड कार्पेटवर सब्यसाचीने डिझाईन केलेली साडी परिधान केली होती.
या लूकमध्ये नताशा खूप सुंदर दिसत होती. या लूकमुळे नताशाचा समावेश बेस्ट ड्रेस्ड कलाकारांच्या यादीत झाला आहे.
नताशा पूनावाला सुद्धा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये एक्झीक्यूटिव संचालक आहे. नताशा पूनावाल एक सोशल सेलिब्रिटी सुद्धा आहे.
नताशा पूनावालाचा जन्म १९८१ साली पुण्यात झाला. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्या परदेशात निघून गेल्या.
इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये नताशा यांनी मास्टर्सची पदवी घेतली. इथे त्यांची अदर पूनावाला यांच्याबरोबर पुन्हा भेट झाली.
त्याआधी गोव्यात विजय मल्ल्या यांच्या पार्टीमध्ये अदर पूनावाला यांच्या बरोबर पहिली भेट झाली होती.