Miss World 2021 : पोलंडची कॅरोलिना ठरली यंदाची 'मिस वर्ल्ड', पाहा फोटो

Nilesh Jadhav

सौंदर्य स्पर्धांमध्ये अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या मिस वर्ल्ड 2021 (Miss World 2021 Winner) स्पर्धेत पोलंड येथील करोलिना बिलावस्का (Karolina Bielawska) हिनं बाजी मारली आहे.

या स्पर्धेच्या 70 व्या पर्वात तिनं Miss World 2021 चा किताब पटकावला आहे.

तर भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक असलेल्या श्री सैनी (Shree Saini) या स्पर्धेची प्रथम उपविजेते ठरली. तर कोटे डी'आयव्होरच्या ऑलिव्हियाने दुसरे स्थान पटकावले.

सॅन जुआन येथील कोरा कोला म्यूझिक हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये करोलिना बिलावस्काच्या डोक्यावर Miss World 2021 चा मुकुट चढवण्यात आला.

करोलिना बिलावस्का मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत आहे. हे केल्यानंतर तिला पीएचडीही करायची आहे.

कॅरोलिनाला अभ्यासाची खूप आवड आहे. अभ्यासासोबतच ती मॉडेल म्हणूनही काम करते. पुढे तिला मोटिव्हेशनल स्पीकर बनायचे आहे.

कॅरोलिनाला पोहणे आणि स्कूबा ड्रायव्हिंग आवडते. याशिवाय तिला खेळातही रस आहे. कॅरोलिनाला टेनिस आणि बॅडमिंटन खेळायला आवडते.

मिस वर्ल्ड 2021 ची स्पर्धा मागील वर्षीच होणार होती, परंतु करोनाव्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनशी एकता दर्शविण्यासाठी या स्पर्धेदरम्यान मेणबत्त्या पेटवून एक गाणे गायले आणि जगाला एकत्मतेचा संदेश दिला.