Nilesh Jadhav
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behare).
छोट्या पडद्यावरील मालिका 'पवित्र रिश्ता' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
ती तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते.
नुकतंच प्रार्थनाने खास फोटोशूट केलं आहे. ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रार्थनाचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे.
मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रार्थनाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
प्रार्थनाने मितवा, कॉफी आणि बरच काही अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
तिच्या चित्रपटांनी तरुणांवर अधिक भुरळ घातली आहे.
प्रार्थनाने अभिषेक जावकर सोबत २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली.
अभिषेक स्वतः लेखक दिग्दर्शक असून दोघांचा संसार अत्यंत आनंदाने सुरु आहे.