माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

जितेंद्र झंवर

बॉलीवुड कलाकारांसारखी जीवशैली कोणाला नको असत. कलाकार त्यांच्या लाइफस्टाइलवर जो खर्च करतात, त्याची कल्पनाही करणे अशक्य आहे.

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने Madhuri Dixit ने मुंबईतील वरळीत एक फ्लॅट नुकताच भाड्याने घेतला आहे. तीन वर्षांसाठी घेतलेल्या या फ्लॅटच्या महिन्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होऊ शकते.

इंडियाबुल्स ब्लू मध्ये असलेल्या फ्लॅटसाठी माधुरी दीक्षितने 3 कोटी रूपये डिपॉझिट भरलं आहे. Zapkey.com ने माधुरीच्या अपार्टमेंट आणि भाड्याची माहिती दिली आहे.

माधुरी दीक्षित घरभाडं म्हणून जी रक्कम देणार आहे त्यामध्ये दरवर्षी पाच टक्के भाडेवाढही होणार आहे. माधुरीने ज्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट रेंटने घेतला आहे तिथे सगळे आलिशान फ्लॅट आहेत .

इंडियाबुल्स ब्लू मध्ये जे फ्लॅट आहेत त्यांची किंमत प्रति स्क्वेअर फूट 70 हजार रूपये आहे. या इमारतीत असणारे सगळे फ्लॅट हे 5 हजार स्क्वेअर फूट आणि 6 हजार स्क्वेअर फूट असे किंवा त्यामधल्या क्षेत्रफळाचेच आहेत.

माधुरीला महिन्याला घर भाडं म्हणून 12 लाख 50 हजार रूपये भरावे लागणार आहेत.

या फ्लॅटचं महिन्याचं जितकं घरभाडं आहे, त्या भाड्यात सामान्यांचे छोट्या शहरात स्वत:चे घर होते. तीन वर्षांसाठी माधुरीने हा आलिशान फ्लॅट रेंटवर घेतला आहे. दरवर्षी पाच टक्के भाडेवाढही होणार आहे.

अपार्टमेंटमधील हा फ्लॅट 5500 स्केअर फूटाचा आहे. या आलीशान फ्लॅटमध्ये 3 बेडरुम, लॉबी व बाल्कनी आहे.

सलमान खाननेही नुकतेच घर भाड्याने घेतल आहे. त्यासाठी त्याने आठ लाख रुपये भाडे दिले आहे. परंतु माधुरीप्रमाणे सलमान स्वत: या घरात राहणार नाही.

सलमान खानने घेतलेल्या घरात त्याच्या संस्थेतील लेखक राहणार आहे.

बॉलीवूड कलाकरांची ही लाईफ स्टाईल कोणालाही परवाडणारी नाही.

माधुरी आता चित्रपटांमध्ये नसली तरी छोट्या पडद्यावर जज म्हणून काम करत आहे.