Visual Story : केके यांची 'ही' गाणे चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील

Mohan Kankate

मुंबई । Mumbai

बॉलीवूडचा (Bollywood) सुप्रसिद्ध गायक केके (KK) म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) याचे कोलकात्यात (Kolkata) काल रात्री एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी केके (KK) याने जगाचा निरोप घेतला...

केके हे त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी तसेच त्यांच्या साध्या राहाणीमानासाठी ओळखले जात होते.केके स्मोक आणि ड्रिंक पासूनही नेहमीच चार हात दूर असायचे.

अशातच त्यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूड (Bollywood) विश्वावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांच्या गाजलेलया गाण्यांविषयी व लाईफस्टाईलबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

केके यांचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. केके यांनी दिल्लीच्या माऊंट सेंट मेरी स्कूल (mount st. mary's school) आणि किरोडी मल कॉलेजमधून (Kirodi Mal College) शिक्षण घेतले होते. विशेष म्हणजे या शिक्षणानंतर त्यांनी सहा महिने एका कंपनीत मार्केटिंग एग्जिक्यूटिव्ह (Marketing Executive) म्हणूनही काम केले. त्यानंतर १९९४ साली ते मुंबईत आले. तसेच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी केके यांनी तब्बल ३,५०० जिंगल्स केली आहेत.

केके यांनी 'माचिस' या चित्रपटातून (Machis movie) आपल्या करिअरची सुरुवात केली होती.तर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हम दिल दे चुके सनम' (Hum dil de chuke sanam) या चित्रपटातील 'तडप तडप' गाण्यातून केके यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला होता

केके यांच्या बॉलीवूडच्या प्रवासाबरोबरच लव्हस्टोरीही तितकीच रंजक आहे. केकेने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आपली बालपणाची मैत्रीण आणि आपले पहिले प्रेम असणाऱ्या ज्योतीसोबत १९९१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी आपत्ये आहेत.

१९९९ साली केके यांनी त्यांचा पहिला वहिला 'पल' नावाचा म्युझिक अल्बम (music album) रिलीज केला होता. यातील 'पल' आणि 'यारों दोस्ती' ही गाणी आजही हिट आहेत.

केके यांनी दोन दशकांहून अधिक काळ संगीत विश्वात 'हम दिल दे चुके सनम'मधील 'तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही', 'हमराज' चं 'बर्दाश्त नहीं कर सकता', 'दस' मधील 'दस बहाने करके ले गए दिल' या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावले.

यासोबतच 'ओम शांति ओम' मधील 'आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं', 'जन्नत' मधील 'जरा सी दिल में दे जगह तू', 'बचना ऐ हसीनों' चा 'खुदा जाने', 'गैंगस्टर' मधील 'तू ही मेरी शब है' 'बस एक पल', 'कोई कहे', 'इट्स द टाइम टू डिस्को' या सारखी एकापेक्षा एक सुपरहीट गाणी गायली.

Picasa