Nilesh Jadhav
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले.
कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…, हम रहे या ना रहे कल…, असं म्हणारा केके अखेर अनंतातविलिन झाला आहे.
केकेवर वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केकेच्या मुलाने मुखाग्नि दिला आहे.
केकेचं अंतिमदर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी राहत्या घरी पोहोचले.;
केकेच्या अखेरच्या प्रवासात 'केके अमर रहे'च्या घोषणाही देण्यात आल्या.