Nilesh Jadhav
शहनाज गिल (Shehnaaz Gill) हे बिग बॉसचं (Big Boss) गाजलेलं नाव आहे. जे कोणीही कधीच विसरू शकणार नाही.
बिग बॉस १३ मधील शहनाजला फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण भारत ओळखतो. सिद्धार्थ शुक्लाच्या (Shehnaaz Gill and Sidharth Shukla) मृत्यूनंतर तिला स्वत:ला सांभाळायला बराच वेळ लागला.
सिद्धार्थच्या निधनानंतर काही काळ शहनाज सोशल मीडियापासून दूर राहिली. त्यानंतर ती हौसला रख या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली. (Shehnaaz Gill new photo)
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाजने सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला होता.
पण आता ती सिडच्या आठवणी घेऊन आपल्या सामान्य आयुष्यात पुढे जात आहे.
अलीकडेच शहनाज गिलने तिचे फोटोशूट बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये शहनाज गिल खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे.
शहनाज गिलचा जन्म २७ जानेवारी १९९३ रोजी अमृतसर येथे झाला. तिने तिच्या करिअरची सुरुवात "शिव दी किताब" मधून केली.