कतरिना-विकी लग्नातूनही असे मिळवणार पैसे

जितेंद्र झंवर

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. ७, ८, ९ डिसेंबरला हे लग्न होणार आहे.

अतिशय खासगी आणि तितक्याच दिमाखदार अशा या विवाहसोहळ्यासाठी आता त्याच पद्धतीनं तयारीही सुरु करण्यात आली आहे. मेहंदी काढण्यासाठीच एक लाख रुपरे कतरिना देणार आहे.

राजस्थानातील जयपूर येथे एका ऐतिहासिक ठिकाणी विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मात्र काही नियम आखून दिले आहेत.

सर्वात महत्त्वाचा नियम असेल, मोबाईल न आणण्याचा आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये यासाठी ही काळजी घेतली आहे.

प्रियांकानं एका आंतरराष्ट्रीय मासिकाशी करार केला होता. ज्यानंतर तिनं लग्नाचे फोटो या मासिकाला विकले. यामधून प्रियांकाला 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच 18 कोटी 12 लाख रुपये मिळाले होते.