कॅटरिनाने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहते शोधताय विकीचे नाव

जितेंद्र झंवर

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (katrina Kaif) नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर विकी आणि कॅटरिना फंक्शनचे फोटो शेअर करत आहेत. आता कॅटरिनाने तिच्या मेहंदीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कॅटरिनाने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळेमध्येच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. अनेकांनी कॅटरिनाच्या हातावरील मेंहदीमध्ये विकीचे नाव शोधण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

कॅटरिनाने तिच्या मेहंदीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकला आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. कॅटरिना कैफने मेहंदी आणि बांगड्यांचा फोटो शेअर करताना हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.